जर्मनीच्या स्टीफन व्हॉर्मन्स पॅराप्लेजिक सायकलिस्टचे आज नाशिकमध्ये आगमन - Deshdoot - 17th February, 2020
17-02-2020
जर्मनीच्या स्टीफन व्हॉर्मन्स पॅराप्लेजिक सायकलिस्टचे आज नाशिकमध्ये आगमन झाले, यावेळी विविध क्षेत्रातील नाशिककर आणि सायकलीस्टच्या वतीने स्टीफनचे मनोभावे स्वागत करण्यात आले. यावेळी नाशिकच्या काही सायकलीस्टने स्टीफनसोबत सायकल चालवून आनंद साजरा केला. स्टीफन नाशिक-पुणे रोडवरील नासिक्ल्ब हॉटेल पोहोचल्यानंतर संचालक रामेश्वर सारडा यांच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. नाशिककरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल स्टीफनने आनंद व्यक्त करत आभार मानले.